आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने १८ रक्तदान शिबिरांचे आयोजन (PCMC)
पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरात आज (मंगळवारी) एकूण १८ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून ही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये तब्बल १,१४० नागरिकांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. (PCMC)
छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्य व धर्मरक्षणासाठी लढा दिला. त्यांनी अतोनात छळ, हालअपेष्टा सहन केल्या. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याची संकल्पना आमदार शंकर जगताप यांनी मांडली आणि शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ती उचलून धरली.
या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. (PCMC)
रक्तदान शिबिरे आयोजित स्थळे आणि संयोजक:
१) समीर लॉन्स, रावेत – दीपक भोंडवे
२) धनश्री हॉटेलच्या मागचे मैदान, विकास मेडिकल समोर, विकास नगर, किवळे – संतोष म्हस्के
३) तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, चिंचवडेनगर, चिंचवड – नामदेव जनार्धन ढाके
४) चिंतामणी चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड – पल्लवी मारकड
५) सुरेश शिवाजी भोईर यांचे जनसंपर्क कार्यालय, काकडे पार्क, चिंचवड – सुरेश शिवाजी भोईर
६) गणेश मुरलीधर गावडे यांचे जनसंपर्क कार्यालय, लक्ष्मी नगर, लिंक रोड, चिंचवड – गणेश मुरलीधर गावडे
७) अधीर इंटरनॅशनल स्कूल, पुनावळे – नवनाथ ढवळे
८) तापकीर माळा चौक, हॉटेल झक्कास शेजारी, काळेवाडी – विनोद तापकीर
९) बापुजी बुवा मंदिर, थेरगांव – अभिषेक गोविंद बारणे
१०) विनायक गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय, वाकड – विनायक गायकवाड
११) गणपती मंदिर, विशाल नगर, पिंपळे निलख – आरती चौंधे
१२) सविता बाळकृष्ण खुळे यांचे जनसंपर्क कार्यालय, रहाटणी – सविता बाळकृष्ण खुळे
१३) चंद्रकांत नखाते यांचे जनसंपर्क कार्यालय, नखाते वस्ती चौक, रहाटणी – चंद्रकांत नखाते
१४) संत तुकडोजी मंदिर, रहाटणी – देविदास गुलाबराव तांबे
१५) उन्नती सोशल फाउंडेशन ऑफिस, पी.के. इंटरनॅशनल स्कूल समोर, कुंजीर चौक, पिंपळे सौदागर – कुटे निर्मला संजय
१६) विश्वकर्मा मंदिर, ६० फुटी रोड, भावनगर, पिंपळे गुरव – राहुल तुकराम जवळकर
१७) महालक्ष्मी मंदिर, नवी सांगवी – सखाराम गणपती रेडेकर
१८) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड – सचिन शिवले
नागरिकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून राष्ट्र व समाजकार्याला हातभार लावला.
मुख्यमंत्र्यांकडे मागणी:
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त महाराष्ट्र रक्तदान दिन घोषित करा – आमदार शंकर जगताप
चिंचवड विधानसभेचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, ११ मार्च हा महाराष्ट्र रक्तदान दिन म्हणून घोषित करावा. (PCMC)
छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या अमानुष छळाला तोंड देत हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी अपूर्व बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ ११ मार्च हा रक्तदान दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये १,१४० शंभूभक्तांचे रक्तदानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
- Advertisement -