Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शिबिरात 101 जणांनी केले रक्तदान

PCMC : शिबिरात 101 जणांनी केले रक्तदान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने हरीशकुमार कौशल्यादेवी बालकिशन भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (PCMC)

यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले. 29 जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. 125 जणांची साखर व हिमोग्लोबिन तपासणी केली.

या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजित गव्हाणे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक राहुल भोसले,अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर, योगेश बाबर, लायन्स क्लबचे झोन चेअरमन मुख्य आयोजक अनिल भांगडिया, रिजन चेअरमन शैलेजा सांगळे, उद्योजक नामदेव पोटे, राष्ट्रतेज मंडळाचे नाना काळभोर, संजय डेंबरे, प्रकाश गादीया, स्वप्नील शेठ, लायन्स क्लब आकुर्डीचे अध्यक्ष बाबुराव सागावकर,सचिव डॉ विनायक बिरादार, खजिनदार निलेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)

यावेळी भांगडिया म्हणाले कि, १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्ती वर्षातून ४ वेळा रक्तदान करू शकतो. रक्त निर्मितीचा कुठेही कारखाना नाही किंवा पैशाने रक्त निर्मिती होत नाही. निरोगी व्यक्तीने वर्षातून ४ वेळा रक्तदान केल्यास ४७ वर्षांत १८८ वेळा रक्तदान होईल.

यातून ५६४ रुग्णांना जीवनदान मिळते. रक्तदान केल्याने पेशींची संख्या वाढते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्षम होते. रक्तदानामुळे रक्ताचा तुटवडा नाहीसा होतो आणि एक माणुसकी जपली जाते.
यावेळी रामदेव बाबा सोशल ग्रुपचे अनिल लखन, सागर आठवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यानी मराठी हिंदी गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

संबंधित लेख

लोकप्रिय