Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ओम गणेश सोसायटी, चिंचवड मध्ये १०० टक्के मतदानाचा निर्धार

PCMC : ओम गणेश सोसायटी, चिंचवड मध्ये १०० टक्के मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक होत आहे. या आधी झालेल्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी खूप कमी झालेली दिसली. (PCMC)

या निवडणुकीत 100% मतदान व्हावे म्हणून अनेक संस्था,मंडळे, वृत्तपत्रे,सामाजिक संस्था आदी माध्यमातून मोठ्या प्रमानात जनजागृती केली जात आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे हा आपला अधिकार आहेच!! पण कर्तव्य सुद्धा आहे. (PCMC)

याचाच एक भाग म्हणून केशवनगर, चिंचवड मधील ओम गणेश सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन 100% मतदान करण्याचा निर्धार केला.


या वेळी सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे, सेक्रेटरी,राजू कोरे, खजिनदार अजित नाईक यांनी मतदान विषयी सर्वांना विस्तृत महत्व सांगितले.

आपल्या सोसायटीतुन तर 100% मतदान तर करूयाच पण आपल्या परिसरात सुद्धा जनजागृती करूयात असा सर्वानी एकमुखी निर्धार केला.
पुढील 3 दिवस श्यक्य तेवढी आपल्या परिसरात जनजागृती करूयात असे अनेकांनी मत व्यक्त केले.

अनेक सदस्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन आजपासूनच जनजागृती करण्याचा निश्चय केला.

संबंधित लेख

लोकप्रिय