Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आशा व गटप्रवर्तकांना सर्व्हेचा मोबदला ३०० रुपये द्या; आयटकची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी.

---Advertisement---

नाशिक (प्रतिनिधी) : आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढच्या निर्णयानंतर शासनाचे आयटकने आभार व्यक्त केले, तसेच आशा व गटप्रवर्तकांना सर्व्हेचा मोबदला ३०० रुपये द्या, या मागणीला घेऊन  आयटकच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देण्यात आले.

---Advertisement---

तसेच यावेळी आशांना ऑक्टोबर २०१९ पासूनची फरक रक्कम देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष राजू देसले यांंनी चर्चा केली. तसेच येत्या काळात आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांना घेऊन आरोग्य मंत्र्यांसोबत मिटींगचे आश्वासन देण्यात आले आहे. 

यावेळी आयटक नेत्या मायाताई घोलप, सुनीताकुलकर्णी, अल्का भोई, लता वाघ, आयटक पेन्शनर्स नेते नामदेव घोलप आदीसह आशा उपस्थित होत्या.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles