Friday, April 19, 2024
Homeआंबेगावनिराधार, अपंगांची पेन्शन त्वरीत अदा करा – किसान सभेची मागणी

निराधार, अपंगांची पेन्शन त्वरीत अदा करा – किसान सभेची मागणी

घोडेगाव : निराधार, अपंगांची पेन्शन त्वरीत अदा करा, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासन ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेसाठी अत्यंत तुटपुंजी पेन्शन दरमहा देते.

आंबेगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार पेन्शन योजना अंतर्गत आदिवासी प्रवर्गातील जे लाभार्थी आहे त्यांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून निराधार पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे सदरील निराधार महिला, पुरुष, अपंग यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सबंधित गरीब लोकांची उपजीविका यामुळे धोक्यात आलेली आहे.

संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची व इतरही निराधार पेन्शन योजनेच्या थकीत असलेल्या रक्कमा त्वरित पेन्शन धारकांच्या खात्यावर जमा कराव्यात अशी मागणी किसान सभेने केली आहे. तसेच, निराधार पेन्शन धारकांच्या पेन्शन रक्कमा यापुढील काळात नियमित त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हाव्यात, अशीही मागणी केली आहे.

निराधार पेन्शन योजनेच्या थकीत रकमा पेन्शन धारकांच्या खात्यावर जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी किसान सभा पुणे जिल्हा समितीचे राजू घोडे, अशोक पेकारी व तालुका समितीचे दत्ता गिरंगे, अर्जुन काळे व अन्य उपस्थित होते.

हे ही वाचा :

नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय

जगातील सर्वाधिक 9 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर, कोण आहेत पहा !

आरक्षित नोकर भरतीबाबत राज्य सरकार घेणार “हा” मोठा निर्णय

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय