Thursday, July 18, 2024
Homeग्रामीणपवार आजोबा अन नातवाला आताच अहिल्यादेवी कश्या दिसल्या ? गोपीचंद पडळकर

पवार आजोबा अन नातवाला आताच अहिल्यादेवी कश्या दिसल्या ? गोपीचंद पडळकर

पुणे : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कधीही अहिल्यादेवी दिसल्या नाहीत. आता मात्र होळकरांच्या जमिनी लाटणाऱ्यांना होळकरशाहीचा पुळका आलेला दिसत आहे. त्या भांडवलावर राजकारणात पुन्हा जम बसवता येईल या भ्रमात राज्यातील काहीजण आहेत.

आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार

मात्र बहुजनांनी आता जागे होवून या लोकांचा कुटील डाव ओळखण्याची गरज आहे, असे टोमणा आमदार पडळकर यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीला मारला आहे.

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

आमदार पडळकर सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शेवगाव शहरातील धनगरगल्ली येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर तरुण मंडळ व सकल धनगर समाज यांच्या संयुक्त विदयमाने बसवण्यात आलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

बोलताना पडळकर यांनी पवार घराण्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, 70 वर्षांत महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना कधीही अहल्यादेवी दिसल्या नाहीत. मात्र आता बारामतीतील आजोबा आणि नातवाला भविष्यातील राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झाला आहे. अठरा पगड जातीत विखुरलेली राज्यातील जनता जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

किसान सन्मान निधी 11 वा हफ्ता 31 मे रोजी मिळणार !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय