नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पावनखिंड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पावनखिंड हा ऐतिहासिक सिनेमा आहे. ज्याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. हा सिनेमा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे.
ज्यात पावनखिंडीची लढाई दिसते. मुख्य स्टारकास्टमध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटातील कलाकारांचे कौतुक होत आहे.
आणि.. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर भडकली!
भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !
चित्रपटाची कथा नेमकी आहे तरी कशी? :
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा सैन्याने पन्हाळगड ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहरने किल्ल्याभोवती पहारा उभारला आहे. त्यामुळे मराठा सैन्य आणि शिवाजी महाराज किल्ल्यातच अडकले. मग योद्धा बाजी प्रभू देखपांडे आणि सेने तिथून पळून जाण्याची योजना बनवतात. पावनखिंड ही मराठा शूर वीरांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची गाथा आहे.
बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 जणांच्या सैन्याने सिद्धी मसूद आणि आदिलशाही सल्तनतच्या सैनिकांचा कसा पराभव केला, हा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगड किल्ल्यावरून यशस्वीपणे दुसऱ्या गडावर पोहोचता आले.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.15 करोड रुपयांची कमाई केली आहे.
पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी