Thursday, August 11, 2022
Homeजिल्हापहिल्याच प्रयत्नात मुख्य यूपीएससी परीक्षा पास होणारे जव्हार तालुक्यातील 'डॉ. अजय डोके'

पहिल्याच प्रयत्नात मुख्य यूपीएससी परीक्षा पास होणारे जव्हार तालुक्यातील ‘डॉ. अजय डोके’

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जव्हार (सुशिल कुवर) : जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील कोगदे गावाच्या येथे वास्तव्यास असणाऱ्या डॉ. अजय काशीराम डोके यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. त्यांना (All India Rank) AIR 705 मिळाली असून भविष्यात ते आयएएस किंवा आयपीएस पदासाठी दावेदार असतील. संबंध पालघर जिल्ह्यात आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे हे बहूधा हे पहिलेच व्यक्ती असावेत. 

अजय डोके यांच्या या यशात त्याचे आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे. अजयचे वडील हे प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणी येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. तर अजयची आई घरकाम करते. अजयची लहानपणी प्रचंड बुद्धिमत्ता होती. अजय डोके हे डॉ. राजेंद्र भारुड यांचे “मी एक स्वप्न पाहिले” हे पुस्तक वाचून प्रेरीत झाले. डॉ. डोके यांनी तरुण पिढीला एक चांगला संदेश दिला आहे वाचन वाढवा, मोबाईलचा वापर कमी करा, स्वता:वर विश्वास ठेवा आणि जिद्दीने अभ्यास करा.

मागील अनेक वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर डॉ. डोके यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे जव्हार तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून डॉ. अजय डोके चे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय