पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चाकण औद्योगिक वसाहतीमधील म्हाळुंगे इंगळे येथील हिताची अस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन च्या (रविवारी दि. 10/09/2023) त्रेवार्षिक निवडणुकीमध्ये युनियचे संस्थापक जीवन येळवंडे यांच्या परिवर्तन पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. Hitachi Astemo Fie
ही निवडणूक सन 2023 ते 2026 या तीन वर्षांसाठी झाली आहे. यामध्ये परिवर्तन पॅनलने विरोधी पॅनेल सत्य मेव जयते चा पूर्णतः धुव्वा उडवला आहे. विरोधी पॅनलचा फक्त एकच उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकी मध्ये एकूण 383 कामगारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

सर्व विजयी उमेदवारची मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार…
1) जीवन येळवंडे – 253
2) कालिदास कान्हूरकर – 225
3) भटु पाटील – 223
4) सुरेश उंबरकर – 219
5) गोरख आगे – 213
6) दीपक टिकार – 199
7) अतुल पाटील – 187
8)विकास देशमुख – 186
मोठ्या संघर्ष नंतर आम्ही अंतर्गत संघटना स्थापना करुन नवीन कामगार प्रतिनिधिना काम करण्याची संधी दिली होती. मात्र, कामगार हितासाठी कमकुवत निर्णय क्षमता कोणताही धोरणात्मक दृष्टिकोन नसल्याने आणि फक्त कामगारांमध्ये दोन गट पाडून राजकीय पक्षाची धोरणं राबवणारे प्रतिनिधी मागील निवडणुकीत निवडून आल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.तो राग त्यांनी आम्ही परिवर्तनाची हाक दिल्यावर मतदानतून व्यक्त केला आहे.
Hitachi Astemo Fie Employees Union च्या रविवारी झालेल्या त्रिवार्षिक निवडणुकी मध्ये माझ्या बरोबर परिवर्तनाच्या मोहिमेत सहभागी झालात त्याबद्दल आम्ही सर्व कामगार प्रतिनिधी कामगारांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत, असे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, महाराष्ट्र व संस्थापक – हिताची अस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन चाकण पुणे चे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले.