Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘प्राईव्हेट पार्ट’मध्ये आले अन् पदक गमावले, वाचा काय झाले खेळात ?

Paris Olympics 2024 : फ्रान्सचा युवा पोल व्हॉल्ट अ‍ॅथलीट अँथनी एमिराती (Anthony Ammirati) सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची त्याची मोठी संधी होती, मात्र एका अनपेक्षित घटनेमुळे त्याला निराश होऊन बाहेर पडावे लागले. 21 वर्षीय अँथनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो योग्य टेक्निकने क्रॉसबार ओलांडत असतानाही त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या धडकेमुळे क्रॉसबार खाली पडताना दिसतो.

---Advertisement---

या विचित्र अपघातामुळे क्रॉसबार खाली पडला आणि अँथनीला (Anthony Ammirati) या स्पर्धेत 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अँथनीची निराशा स्पष्टपणे दिसत होती कारण तो अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दावेदारांपैकी एक मानला जात होता. याआधी त्याने 2022 अंडर-20 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, ज्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

Anthony Ammirati

अँथनीने आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र या विचित्र घटनेमुळे त्याच्या या स्वप्नाला धक्का बसला आहे. फ्रान्समध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेमुळे अँथनी एमिरातीच्या नावे चर्चेचा विषय बनला आहे. खेळातील असाधारण प्रसंग आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असतानाही अँथनीला या विचित्र अपयशामुळे निराश व्हावे लागले.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles