Thursday, January 23, 2025

परभणी : डीवायएफआयच्या वतीने रोजगारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन

परभणी : आज राज्यात रोजगार व शिक्षण यासंदर्भात डीवायएफआयच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील डीवायएफआय या युवक संघटनेने पूर्णा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना रोजगार व शिक्षण संदर्भात विविध मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्हताप्राप्त असलेल्या तरुणांचे भवितव्य अंधारात ठेवले आहे, अशीच २९९६ तरुण विद्यार्थी आहेत ज्यांची मुख्य परीक्षा, मुलाखत रखडलेली आहे. त्यांचे भवितव्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धोक्यात आले आहे आणि याच कारणाने तरुण वर्ग नैराश्याच्या गर्तेत जात आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने पूर्व, मुख्य परीक्षा पास होऊन सुद्धा दोन वर्ष मुलाखत नाही झाली या नैराश्यातून स्वप्नीलने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तसेच, खाजगी शाळांकडून सामान्य विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबावी, विद्यार्थ्यांची ५०% फीस माफ करावी, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणाऱ्या खाजगी शाळांचे परवाने रद्द करावे, आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व MPSC च्या परीक्षेची पूर्तता करावी, शासकीय विभागातील महापोर्टल बंद करावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन DYFI या संघटनेच्या तरुणांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.

या निवेदनावर नसिर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, जय ऍंगडे, अजय खंदारे, सचिन नरनवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles