Wednesday, September 28, 2022
Homeग्रामीणपांडुरंग महाराज व देवराम लांडे वादावर अखेर पडदा, दबाव टाकून बोलायला सांगितले...

पांडुरंग महाराज व देवराम लांडे वादावर अखेर पडदा, दबाव टाकून बोलायला सांगितले असल्याचा निर्वाळा

जुन्नर : केवाडी येथील पांडुरंग महाराज लांडे व जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांची एकमेकांवर टिका सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

पांडुरंग महाराज लांडे हे देवराम लांडे यांच्यावर टिका करताना म्हणाले होते, “देवराम लांडे बनवेगिरी करत असतात, केवाडी गावामध्ये पिण्यासाठी देखील पाणी नाही. डी. पी. सुध्दा स्वतःच्या शेतात बसवली आहे, असे अनेक आरोप करण्यात आले होते.

त्यानंतर देवराम लांडे यांनी देखील पांडुरंग महाराजांवर सडकून टिका केली होती. परंतु आता पांडुरंग महाराज म्हणाले की, हे सगळं मला बोलायला सांगितले होते. हे असं बोलं, तसं बोलं म्हणून सांगितले होते. परंतु आता प्रकार केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचेही ‘जुन्नर टाईम्स’ या युट्यूब चँनेलशी बोलताना सांगितले. त्यामुळे विनाकारण वादंग निर्माण केला जात असल्याचेही समजते.

यावेळी बोलताना देवराम लांडे म्हणाले, पांडुरंग महाराज आणि माझा वाद नाही. यापुढे आमच्या गावात भांडणे लावायचे काम केले तर कायदेशीर कारवाई करु.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय