Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्याच नाहीत पुणे पोलिसांचा दावा !

शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते .या आंदोलनावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल झाले होते. त्यावेळी आंदोलकांनी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या नाहीत .आंदोलनाकडून यावेळी पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद, पी एफ आय जिंदाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या, असा दावा पुणे पोलिसांनी केला असून आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. एनआयए तर्फे देशभरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे .

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles