इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी एका मुलाखतीत सनसनाटी खुलासा करताना कबूल केले की, गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना समर्थन, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली आहे. ही कबुली भारताने अनेक वर्षांपासून सातत्याने मांडलेल्या आरोपांना पुष्टी देणारी आहे. ही कबुली जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत, जवान पाकिस्तानच्या ताब्यात)
Khawaja Asif यांच्या मुलाखतीतील खुलासा
स्काय न्यूजच्या याल्दा हकीम यांनी घेतलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांना पाकिस्तानच्या दहशतवादाला समर्थन देण्याच्या इतिहासाबाबत प्रश्न विचारण्यात आला. हकीम यांनी विचारले, “तुम्ही हे मान्य करता का की, पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना समर्थन, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली आहे?” यावर आसिफ यांनी स्पष्टपणे सांगितले, “गेल्या तीन दशकांपासून आम्ही अमेरिकेसाठी आणि पाश्चिमात्य देशांसाठी, हे घाणेरडे काम करत आहोत. ही एक चूक होती, आणि यामुळे पाकिस्तानला खूप त्रास सहन करावा लागला.” (हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली तारिख)
आसिफ यांनी १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात आणि २००१ मधील ९/११ च्या हल्ल्यांनंतरच्या काळात पाकिस्तानने अमेरिकेच्या बाजूने लढताना दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचे नमूद केले. त्यांनी दावा केला की, या काळात आजचे दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये ‘वाइनिंग आणि डायनिंग’ करत होते आणि अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील सोव्हिएत युद्धात दहशतवाद्यांचा ‘प्रॉक्सी’ म्हणून वापर केला. (हेही वाचा – 12 लाखांची बाइक, 70 हजारांचे हेल्मेट चक्काचूर ; कोल्हापूरच्या तरूणाचा भीषण)
पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी
आसिफ यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरण व्हॅलीमध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला आहे. हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी गटाने केल्याचा दावा केला आहे, जो पाकिस्तानस्थित बेकायदा लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा एक उपगट मानला जातो. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. (हेही वाचा – पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश : सीमा हैदरचे काय होणार ?)
पाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे. आसिफ यांनी मुलाखतीत म्हटले की, “लष्कर-ए-तय्यबा हे जुने नाव आहे, आता ते अस्तित्वात नाही. आमच्या सरकारने पहलगाम हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला आहे.” तथापि, त्यांनी दहशतवाद्यांना दीर्घकालीन समर्थन दिल्याचे कबूल केले आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : नागपुरात 2 हजाराहून अधिक तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक)