Thursday, September 19, 2024
Homeआंतरराष्ट्रीयवीस लाख टन गव्हासाठी पाकिस्तानचा रशियाला पाठिंबा!

वीस लाख टन गव्हासाठी पाकिस्तानचा रशियाला पाठिंबा!

 

वीस लाख टन गहू आणि नैसर्गिक वायूंच्या पुरवठासाठी पाकिस्तान ने रशिया ला पाठिंबा दिला आहे. रशिया ला पाठिंबा देणारा पाकिस्तान हा जगातील एकमेव देश ठरला आहे

पाकिस्तानला रशिया कडून आर्थिक मदत हवी होती. त्यासाठी पाकिस्तानने रशियावर काही अटी लादल्या .जसे की रशिया मधील नैसर्गिक वायूंचा साठा पाकिस्तान मध्ये विक्रीसाठी उपलब्ध व्हावा आणि अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी वीस लाख टन गहू पाकिस्तानला मिळावा या करार पत्रकावर रशियाच्या स्वाक्षऱ्या करून पाकिस्तानने रशियाला पाठिंबाच दिला आहे.

एकीकडे संपूर्ण जग हे युक्रेन च्या बाजूने आहे मात्र पाकिस्तान आणि चीन यांचा उघडउघड रशियाला पाठिंबा आहे .अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनीसुद्धा रशियावर कडक निर्बंध लादले आहेत .त्यांचा युक्रेनला पूर्ण पाठिंबा आहे. भारताने मात्र या युद्धाच्या पार्श्वभूमीवर न्यूट्रल राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र युक्रेनच्या सैन्याकडून बॉर्डरवर भारतीय विद्यार्थ्यांचा छळ होत आहे त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्या सरकारला छळ थांबविण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय