Sunday, March 16, 2025

राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर वाद पेटला, सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

सोलापूर : सोलापूर शहरातील रेल्वेलाईन परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे, बुधवारी रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर आज दुपारी ही घटना घडली.

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आणि प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर आटपाडी या ठिकाणी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी पुन्हा सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड करणारे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध गोपीचंद पडळकर असा वाद होताना दिसत आहे.

दरम्यान, पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. तसेच पडळकर यांनी ट्विट करून आमदार रोहित पवार यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीच्या फोटो ट्विट केला होता.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles