Packaged Water : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी बॉटल बंद पाणी आणि मिनरल वॉटर यांना ‘अतिधोकादायक’ कॅटेगरीत समाविष्ट केले आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार पाणी पुरवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, आता सर्व बॉटल बंद पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांची दरवर्षी अनिवार्य तपासणी केली जाणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारकडून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कडून सर्टिफिकेट घेण्याची अट रद्द केल्यानंतर घेण्यात आला आहे.
एफएसएसएआयच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही नव्या कंपनीला लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन देण्यापूर्वी त्यांच्या उत्पादनाची सखोल तपासणी केली जाईल. शिवाय, दरवर्षी थर्ड पार्टी ऑडिट देखील अनिवार्य असेल, ज्यामुळे पाण्याचा दर्जा कायम राहील याची खात्री केली जाईल. (Packaged Water)
बॉटल बंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट विभागाचे एचओडी डॉ. राजेश हर्षवर्धन यांच्यानुसार, बॉटल बंद पाण्यातील मायक्रोप्लास्टिक मानवी आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करते. माइक्रोप्लास्टिकमुळे मेंदूला हानी पोहोचू शकते, तसेच हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते.
डॉ. वली यांच्या मते, अन्नपदार्थांचे आणि पाण्याच्या पॅकिंगवर योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या लोकांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, थकवा आणि विविध आजार दिसून येत आहेत. भविष्यात या समस्यांचा अधिक अभ्यास होईल, परंतु त्याआधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. (Packaged Water)
एफएसएसएआयचा हा निर्णय बॉटल बंद पाणी उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी नवा मापदंड ठरेल, असे मानले जात आहे. ग्राहकांनी देखील बॉटल बंद पाणी वापरण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि प्रमाणपत्र तपासणे महत्त्वाचे आहे.
(Packaged Water)
हे ही वाचा :
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
जुन्नर : घाटघर येथील विद्यार्थ्यांना शिवदुर्ग ट्रेकर्सतर्फे ब्लॅंकेट वाटप