Sunday, March 16, 2025

.. तर निवडणुका होतील, गाफील राहू नका – अजित पवार

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : राज्य सरकारने निवडणुकीसाठी केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच होऊ शकतात. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे सहा महिन्यांनी निवडणूक होणार, दोन सदस्यांचा वार्ड होणार ? या सर्व वावड्या आहेत. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले.

पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्घाटन संपन्न झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, जनतेला आता एकमेकांवर होणारे आरोप ऐकण्यात अजिबात रस नाही. जनतेचे पायाभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. परंतु जनतेच्या समस्या सोडवणे बाजूला राहते व आरोप प्रत्यारोप केले जातात. याला माध्यमांनीही महत्व न देता सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे’.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता !

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा, आझाद मैदानावर होणार “संताप मोर्चा”

Related Articles

- Advertisement -

Latest Articles