Wednesday, February 5, 2025

उस्मानाबाद : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना लहुजी पँथर तर्फे अभिवादन !

उस्मानाबाद : आज रविवार दि. १८ जुलै रोजी उस्मानाबाद येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून भारतीय लहूजी पँथर या राज्यव्यापी संघटनेची बैठक  संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी अंकुश मल्हारी पेठे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

यावेळी झोंबाडे यांनी भारतीय लहूजी पँथरची ध्येय व धोरण काय आहेत हे समजावून सांगितले. लहू, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचाराने समाज घडविणे व अन्याय अत्याचार विरोधात वाघाच्या भूमिकेतून उत्तर देणे हे संघटनेचे काम आहे. व ते करत राहणे काळाची गरज आहे, असेही झोंबाडे म्हणाले.

यावेळी उस्मानाबाद नगर परिषदच्या नगरसेविका विद्या देवानंद एडके, असंघटीत कामगार काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष देवानंद एडके, समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते खंडू झोंबाडे, उस्मानाबाद तालूका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रॉबीन बगाडे, सचिन बगाडे, रोहनपेठे, संजय कसबे, बाळू कांबळे, राहूल पेठे, पांडूरंग कसबे, अक्षय झोंबाडे, नितीन आगळे, सुरेखा झोंबाडे, सविता झोंबाडे, अनिता पेठे व अन्य कार्यकर्ते उपास्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles