तिर्थक्षेत्र तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे वृक्षारोपण करतांना जलपरिषद मित्र परिवार
जुलैपर्यंत लावणार 1,111 वृक्ष
सुरगाणा / दौलत चौधरी : जलपरिषद मित्र परिवार तर्फे पेठ, सुरगाणा, दिडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध सामाजिक समस्यांवर समाज प्रबोधन करीत पाणी अडवा, पाणी जिरवा, वनराई बंधारे बांधून पाणी टंचाई दुर करावी, कोल्हापूर बंधारे, मातीचे पाझर तलाव बांधणे, कोरोना विषयक जनजागृती, लसीकरणा विषयी आदिवासी बांधवांमधील असलेली भीती दुर करुन लस घेण्यासाठी प्रवृत करणे, वृक्षारोपण व संवर्धन करणे, गलोल प्रतिबंधक योजना राबवून पक्षी वाचवा, पक्ष्यांकरीता दाणापाणी अशा एक ना अनेक उपक्रम जलपरिषद मित्र परिवारा तर्फे आयोजित केले जातात.
त्याचप्रमाणे उंबरपाडा पिपळसोंड येथे जलजीवन मिशन मार्फत ग्रामपंचायत गोंदुणे तर्फे गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच गावाकरीता बोअरवेल काढून पाच वर्षांपुर्वी उंबरपाडा लगतच कुंभारचोंड येथे बांधलेल्या जलशिवार योजनेच्या सिंमेट बंधारा बांधण्यात आल्याने जमीनीतील पाणी पातळी वाढल्याने बोअरवेल मध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असून ते तीन हजार फुट अंतरावरुन गावात आणून पुरवठा केला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
या उपक्रमाचे लोकार्पण जलपरिषद मित्र परिवारा तर्फे करण्यात आले. त्याच प्रमाणे तातापाणी पिंपळसोंड येथे जलपरिषद मित्र परिवारा तर्फे वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, बेहडा, हिरडा, पेरु, चिंच, चिकू, सिताफळ, नारळ या झाडांचा समावेश आहे.
यावेळी चला सर्वांनीच पुढाकार घेऊन झाडे लावू, झाडे जगवू या अशा संदेश देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ माजी सैनिक शिवराम चौधरी, तातापाणीचे पुजारी, लहानुभाई गावित, तुळशीराम खोटरे, मंगला चौधरी, साकरुबाई चौधरी, लता देशमुख, गोविंद देशमुख, सोन्या बागुल, जलपरिषदेचे राकेश दळवी, गितेश्वर खोटरे, हिरामण चौधरी, गुलाब चौधरी, संजय गवळी, दुर्वादास गायकवाड, योगेश महाले, देविदास कामडी, पोपट महाले, अनिल बोरसे, एकनाथ भोये, गणेश सातपुते, तुषार हिरकुड, अशोक तांदळे, हिरामण शेवरे, धर्मराज महाले, नामदेव पाडवी, यशवंत धुम, माधव धुम, आनंदा गवळी, जगदीश चौधरी, करण चौधरी, हंसराज धुम, राजू गवळी, गुलाब गवळी, प्रांजल महाले, रोहिदास गायकवाड, अजय मुडा, हुशार हिरकुड, प्रकाश पवार, आदी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते.