हडपसर : प्राणीशास्त्र, भूगोल आणि आय क्यु.ए .सी यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पॅक्ट ऑफ अंथरपोजेनिक ऍक्टिव्हिटीज व नेचरल केल्यामीलिडीज ऑन बायोडायव्हर्सिटी या विषयावर दिनांक 15 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले आहे.
या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण जम्मू-काश्मीर विद्यापीठाचे डॉ. कुलदीप शर्मा करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे डॉ. बबन इंगोले उपस्थित राहणार आहेत.
तसेच डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई रत्नागिरी, डॉ. रॉबर्ट केस प्रेझेक पोलंड, डॉ.रोबोर्ट पेरेरिया अमेरिका, विचार व्यक्त करणार आहेत, अशी माहिती एस. एम .जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली.