पुणे, दि. ३० : आषाढी वारीचे औचित्य साधून कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना कौशल्याबाबतचे ज्ञान, विविध योजना व उपक्रमांची माहिती अवगत होण्याच्यादृष्टीने पुणे शहरात २ जुलै रोजी कौशल्य विकास दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाने दिली आहे. (Pune)
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, आयुक्त निधी चौधरी व संचालक डी.ए. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याबाबतचे ज्ञान नागरिकांना अवगत करण्याच्या अनुषंगाने कौशल्य विकास दिंडीचे २ जुलै रोजी पुणे शहरातील गोळीबार मैदानापासून ते हडपसर येथील गाडीतळ पर्यंत आयोजन करण्यात येणार आहे. (Pune)
स्वतः मंत्री लोढा भैरोबा नाला ते मगरपट्टा चौक दरम्यान दिंडीत सहभागी होतील. पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारीत संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीदेखील या दिंडीत सहभागी होणार आहेत.
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कौशल्य विकास दिंडीला भेट देऊन कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
हेही वाचा :
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!
Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती
मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय
मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा
T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !
बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !
अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा