मांजरी बु: प्रत्येक शिक्षकाने आपल्या शैक्षणिक सत्रात चाकोरीबद्ध राहून ज्ञानदानाचे कार्य केल्यास शिक्षक विद्यार्थीप्रिय होतो असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केले. मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रताप जगताप यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे तसेच कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार घुले, प्राचार्य डॉ.रितेश पाटील, सत्कारमूर्ती प्रताप जगताप सहकुटुंब उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्रताप जगताप यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रताप जगताप हे आपल्या २३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा.अजित डुंबरे व अजित गुंड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी सूत्रसंचालन व अजित गुंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/11/IMG-20221102-WA0001-640x1024.jpg)
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_115640-1-759x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/10/IMG-20221025-WA0028-2-791x1024.jpg)