Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ उद्योगनगरीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भोसरीतील डायनोमर्क कंपनीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरामध्ये 130 कामगारांनी सहभाग नोंदवला.कामगारांना धनुर्वात (टी.टी.) इंजेक्शन तसेच हाडाची ठिसुळता,मधुमेहाची तपासणी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.

यावेळी केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सांगितले कि,ज्या कंपन्यांनी शिबिराची मागणीची नोंद आमच्या कल्याण मंडळाकडे केली आहे,तेथे मंडळाचे सहाय्यक आयुक्त समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेत असतो.यापुढे ही घेणार आहोत आमच्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी आव्हान केले.तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे कवी संमेलन मिरजला 24 ते 25 फेफ्रूवारीला होत आहे कामगारांनी सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.

---Advertisement---


यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की,”सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य होय” निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे, कामगारांनी  निरोगी राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे ,आपल्या आरोग्या ची काळजी आपणच घेतली पाहिजे, त्याचबरोबर बरोबरच कामगार कल्याण मंडळ भजन स्पर्धा, शिष्यवृत्ती योजना, क्रीडा शिष्यवृत्ती ,विविध पुरस्कार नाट्य स्पर्धा, कबड्डी स्पर्धा ,बरोबरच  अनेक कामगार कल्याणकारी योजना राबवित आहे आणि कामगारांनी   सहभागी होण्याचे गुणवंत कामगार आण्णा जोगदंड आवाहन यांनी केले, सर्व कामगारांचे आरोग्य शिबिरचे आयोजन केल्यामुळे जोगदंड यांनी मंडळाचे आभार मानले.

सुर्यकांत मुळे यांनी कामगार कल्याण योजनाचा कामगारांनी फायदा करून घेण्याचे आव्हान केले.शिबिराचे संयोजन मनुष्यबळ प्रमुख सूर्यकांत मुळे,गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,पंडीत वनसकर, कंपनीचे मुख्य कार्यकारी आधिकारी  किशोर राऊत, यांचे सहकार्य मिळाल्याचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सांगितले.यावेळी  शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल चे गुणवंत कामगार संजय साळुंखे व डॉ.जयवंत श्रीखंडे,डॉ.आदित्य देशमुख,आण्णा जोगदंड, सी.ई.ओ. प्रकाश अभ्यंकर,व्यवस्थापक हेमंत नेमाडे, हनुमंत जाधव, वनिता कडाळे,ज्योती नवदगिरे,शितल मंडलिक,सुर्यकांत मुळे सोमनाथ वाघ,सचिन शेळके,सचिन सदाफुले,यानी परीश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles