Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दिल्लीतील प्रदूषणामुळे शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंदचा आदेश

---Advertisement---

नवी दिल्ली, ता.१३ : दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारनं कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारपासून एका आठवड्यासाठी शाळा बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. तसेच सरकारी कार्यालयं देखील बंद राहणार असून सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

---Advertisement---

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत तातडीच्या उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषणावर नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी कार्यालये, शाळा, शहरातील सर्व बांधकामे बंद करण्याचा आदेश दिला.

 


खाजगी कार्यालयांसाठीही आवाहन करणारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच १४ ते १७ नोव्हेंबर हे चार दिवस दिल्लीतील बांधकामाची कामेही बंद राहणार आहे. दरम्यान, दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी गाड्या या आदेशामुळे रस्त्यावर येऊ शकणार नाहीत आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles