Thursday, August 11, 2022
Homeजनमतजनमत : तो अलमट्टीचा परिणाम... - अनंत धनवडे

जनमत : तो अलमट्टीचा परिणाम… – अनंत धनवडे

spot_imgspot_imgspot_imgspot_img

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 35 गावातील गेल्या दोन दिवसांपासून 36 तासात 32 इंच पाणी उतरत आहे. याचे उत्तर आहे का कोणाकडे? सरळ सरळ दिसत आहे शिरोळ तालुका अलमट्टीच्या बॅकवॉटर मध्ये सापडला आहे. शिरोळ तालुक्यातील परिसरातील सर्व अशिक्षिताना पण माहीत आहे पाणी उतरायला सुरुवात झाली की दोन दिवसात पाणी पात्रात जाते पण असे होताना दिसत नाही आहे. तरी वडनेर समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला नाही. समितीने यावे आणी पटवून सांगावे 36 तासात 32 इंच पाणी का संथपणे उतरत आहे. कोल्हापूरचे पाणी उतरले सांगलीचे पाणी उतरले पण अर्जुनवाड कनवाड शिरटी ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी पासुन पुढे पाणी उतरता उतरत नाही आहे. पाणी उतरताना त्याला कोणीही अडवू शकत नाही. 

पाणी जायचे झाले तर डोंगर कपारीतून ही निघून जाते. भराव, बांधकाम, पुल, पात्रातील बांधकामे ही आडवू येऊ शकत नाहीत. नको ते निष्कर्ष काढण्यात काय उपयोग नाही. कारण ज्याची जळत्या त्यालाच कळते कारण शिरोळ तालुक्यातील 35 गावांचे आतोनात नुकसान होत आहे. सर्व सामान्य दुकानदार, सामान्य लोकांची घरे, शेतकऱ्यांची हाताला आलेली उभी पिके यांचे नुकसान पाहायचे असेल तर पुर ओसरल्यावर पाहयला या म्हणजे समजेल नुकसान काय असते? हे सर्व घडत आहे अलमट्टी धरण 2004 साली भरण्यास चालु झाले नंतर 2005 चा 2006 चा 2019 आता 2021 असा सलग पुर या परिसरातील लोकांनी पाहीला आहे. असेच होत राहीले तर शिरोळ तालुक्याचे कंबरडे मोडल्या शिवाय राहणार नाही. तालुका परत उभा राहणे अशक्य आहे. या वर तोडगा काढून अलमट्टीची पाणी साठवण उची कमी करणे आवश्यक आहे. 

धरण साठ्याला जोरदार विरोध झाला पाहीजे नाहीतर हे कायमचेच संकट ओढवून घेतले पाहीजे हे नक्कीच पाऊस थांबून तीन दिवस झाले तरी पाणी संथ गतीने उतरत आहे ह्यातच काय गोम आहे ते समजून येत आहे.

– अनंत धनवडे 

– श्री क्षेत्र नृसिंहवाडी  

– 9851101101

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय