पुणे : ‘ट्रायफेड’ कडुन आदिवासी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.
‘ट्रायफेड’ च्या माध्यमातून देशातील आदिवासी समाजाला “जीवन निर्वाह सह सुरक्षिततेचे प्रोत्साहन” देणार आहे.
वन उत्पादनांसाठी प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यसंवर्धनाची उपलब्धता आणि आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला स्वावलंबी व सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून ट्रायफेडचे विभागीय व्यवस्थापक मयूर गुप्ता यांनी ही ऑनलाईन कार्यशाळा घेतली.
या कार्यशाळेमध्ये वन धन योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 264 वन धन केंद्रे असून यामधील विविध उत्पादने व त्या संदर्भात केल्या जाणाऱ्या विकास योजना यांची माहिती आदिवासी समाजातील तरुण बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये राज्य शासनाचे शबरी आदिवासी विकास महामंडळ, तसेच आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत ट्रायफेड प्रयत्न करत आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागातील आजी माजी आमदार, तसेच टेक्निकल एजन्सिज महामंडळे, शबरी महामंडळ, मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, विविध संस्थां यांंचे अधिकारी व पदाधिकारी तसेच ट्रायफेड चे वनधन टीम एम के पंड्या, शिवा सी, रोहित शिंदे, गणेश धराडे, राजेश, अतुल यांचा सहभाग होता.
आदिवासी बांधवांच्या छोट्या – मोठ्या लघु उद्योगांसाठी किंवा उत्पादनांसाठी एक जागतिक पातळीवर बाजारपेठ निर्माण करुण आदिवासी तरुणांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती.