Saturday, March 15, 2025

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम २०२० -२१ साठी हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी दि. १५ सप्टेंबर पासून सुरु होणार झाली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी ६ हजार, मूगासाठी ७ हजार १९६ हमी भाव जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :

● आधारकार्डाची छायांकित प्रत. 

● पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा.

● शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.

खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाण्याचे आहे.

उडीद मुग खरेदी ऑनलाईन पध्दतीने होणार असून शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles