Thursday, July 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदिव्यांग विद्यार्थ्यांना आता एक लाखाचे अर्थ सहाय्य, पिंपरी चिंचवड मनपाचा उपक्रम

दिव्यांग विद्यार्थ्यांना आता एक लाखाचे अर्थ सहाय्य, पिंपरी चिंचवड मनपाचा उपक्रम

पिंपरी चिंचवड : दिव्यांग विद्यार्थ्यांना बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तिप्पट अर्थसहाय्य देण्याची घोषणा आयुक्त राजेश पाटील यांनी केली आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यासायिक शिक्षणासाठी प्रथम वर्षासाठी २५ हजार रुपयांऐवजी आता एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. गरजूंना योग्य लाभ देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. विविध घटकांना लाभ देताना सर्वंकष विचार करून योजनांची आखणी करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना राबविली जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी !

एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयुएमएस, एमबीए अशा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाकरिता २५ हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येत होते. आता ही अर्थसाहाय्य रक्कम वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच यामध्ये नव्या शिक्षण शाखांचाही समावेश करण्यात आला आहे. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयुएमएस या शिक्षण शाखांसह ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्ट (B Arch), ‘बॅचलर ऑफ फिजिओथेरपी’ (BPTH), ‘बॅचलर ऑफ फार्मसी’ (B Pharm), ‘बॅचलर ऑफ वेटेरीनरी सायन्स’ (BVSC) या शिक्षण शाखांचा समावेश करण्यात आला असून, या योजनेमधून एमबीए (MBA) ही शाखा वगळण्यात आली असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

योजनेच्या विहित अटीशर्ती – संबंधित अर्जदार हा महापालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक, अर्जदाराने अर्जासोबत त्याच्या आधार कार्डची प्रत, मतदार ओळखपत्राची प्रत किंवा त्याचे नाव असलेल्या मतदार यादीची प्रत, चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाबाबतचे शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयाकडील वैद्यकीय प्रमाणपत्र, महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतल्याबाबतची फी भरल्याची पावती, बोनाफाईड सर्टिफिकेट, शासनाने विहित केलेल्या गुणवत्तेच्या पद्धतीनुसार फ्री सीट अथवा मेरीट सीट प्रवेशपत्र, मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिकेची प्रत आणि बँक पासबुकची सत्यप्रत जोडणे आवश्यक ‘‘दिव्यांग व्यक्तींचे शैक्षणिक आणि सामाजिक समावेशन करण्यासाठी तसेच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगाराची व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय