Tuesday, September 17, 2024
Homeजिल्हाएका क्लिक वर मिळणार माहिती ; एमपीएससीने विकसित केले मोबाईल ॲप्लिकेशन !

एका क्लिक वर मिळणार माहिती ; एमपीएससीने विकसित केले मोबाईल ॲप्लिकेशन !

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरती परीक्षांची माहिती उमेदवारांना आता अधिक सुलभतेने मिळू शकणार आहे. एमपीएससीने आता मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून, विविध भरती प्रक्रिया, परीक्षा आदींबाबतची माहिती उमेदवारांना त्याद्वारे मिळू शकेल.येत्या काळात अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरण्याची सुविधाही ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1085 जागा, 17 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

एमपीएससीद्वारे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा राज्यातील लाखो उमेदवार देतात. विविध पदांच्या जाहिराती, परीक्षा, अर्ज प्रक्रिया या संदर्भातील माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावरून दिली जाते. अलीकडेच एमपीएससीकडून ट्विटरसारख्या समाजमाध्यमाचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने उमेदवारांना सुलभतेने माहिती देण्यासाठी ‘एमपीएससी’ या स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या अँड्रॉईड प्रणालीसाठीचे ॲप विकसित करण्यात आले आहे, तर आयओएस प्रणालीसाठीचेही ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 8 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

संबंधित लेख

लोकप्रिय