पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या विविध धर्मगुरू आणि शहरातील नागरिक यांचा “अमन भूषण” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष युसूफ कुरेशी म्हणाले “पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक नेहमीच सर्वधर्म समभाव आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. भारतात कुठेही जातीय दंगल होतात परंतु पिंपरी चिंचवड मध्ये आज पर्यंत असा प्रकार घडला नाही याचं कारण म्हणजे या धर्मगुरूंनी सर्व धर्मातील समाजातील लोकांना एकरूपपणे बांधून ठेवलं आहे आणि या कार्यक्रमातून सेलच्या वतीने त्यांचा सन्मान केला गेला. जातीय सलोखा आणि एकात्मता संदेश पिंपरी चिंचवड शहरवासींना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देण्यात आला.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “गेल्या आठ वर्षापासून केंद्रातील भाजप सरकार लोकांमध्ये जाती जातीवरून द्वेष पसरवत आहेत. आता बहुजन महापुरुष यांना बदनाम करून आणि संघ आणि भाजपचे नेत्यांना मोठं करायचं षडयंत्र रचत आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत आहे महाराष्ट्रातील काही शहरावर कर्नाटक मधील भाजप सरकार बेकायदेशीर दावा करत आहे. अशा महाराष्ट्र विरोधी गतिविधि भाजप सातत्याने करत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल यांनी सर्वधर्मसमभाव असा कार्यक्रम घेतला तो कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान भाई शेख, कार्याध्यक्ष फजल भाई शेख नगरसेवक पंकज भालेकर, उद्योजक दिशेन भाई सय्यद, विशाल काळभोर, एड.गोरक्षनाथ लोखंडे, गुलाब रसूल हाजी सय्यद गुलाम, शहाजी आत्तर, हाजी अकबर मुल्ला,बशीर मुलांनी, वियम कबीर, फैज दलाल मुस्ताक भाई शेख, विदेश मेमन, फकीर मुलांनी, सलीम मेमन, इमरान मेमन, शकील कुरेशी, फारुख कुरेशी, हुसेन मुलानी, मंजूर कुरेशी, साहुल शेख,जहीर खान,नासीर शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



