मुंबई : यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विशेष योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार आहे. या संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लीटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नांचा समावेश असणार आहे.
या योजनेचे वितरण दि. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या ‘आनंदाचा शिधा’ संचाचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने या योजनेसाठी ५६२.५१ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे, ज्यामुळे शिधापत्रिकाधारकांना सहज आणि सोयीस्कर पद्धतीने ‘आनंदाचा शिधा’ मिळू शकेल. (Anandacha Shidha)
या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना सणाच्या काळात थोडा आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांचा उत्सव अधिक आनंदमयी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत