मुंबई, ता. २६ : एकीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे एसटी महामंडळाने प्रवास दरात १७.१७ टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज २६ ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, साधी जलद व रात्री सेवेसाठी प्रति टप्पा ९.७ रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा १२.८५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा १३.३५ रुपये तर शिवनेरी सेवेसाठी १९.५० रुपये. प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे.
एसटीच्या प्रवास भाड्यात १७.१७ टक्क्याने वाढ
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/AJe741yne3
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 25, 2021
रातरानी सेवेचा अतिरिक्त दर रद्द करून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचे तिकिट दर सारखेच ठेवण्याचा महत्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
अधिक वाचा :