Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणऑल इंडिया स्टुडंट्स फेडेरेशन बार्शी यांच्या वतीने विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा व सत्कार...

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडेरेशन बार्शी यांच्या वतीने विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सोलापूर : बार्शी येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडेरेशनच्या वतीने 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन मेळावा व 80 त्याच्यापुढे मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा 1 ऑगस्ट 2021 रोजी आयटक कामगार केंद्र बार्शी येथे घेण्यात आला

कोवीड मूळे विद्यार्थी शिक्षणापासून तुटत आहेत. म्हणून चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये उत्साह वाढावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दहावी पास झाल्यावर कोणते क्षेत्र निवडावे हे विद्यार्थ्यांना समजावे, कोणत्या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत यासाठी कोणती फील्ड निवडावे याचे मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये करण्यात आले.याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 80 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास कोव्हीड १९ चे नियम पाळून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना कॉम्रेड प्रवीण मस्तुद यांनी मार्गदर्शन केले, तर मेळावा यशस्वी करण्यासाठी पवन अहिरे, सुयश शितोळे, अविराज चांदणे, दीपक कोकाटे, जगगुरू गिरी, सारंग पवार, सागर खडतरे, भारत पवार, आनंद धोत्रे आदीं प्रयत्न केला.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय