Friday, April 19, 2024
HomeNewsदिल्लीत एनसीसी संचालन रँलीत ओमिका काळे यांचा सहभाग

दिल्लीत एनसीसी संचालन रँलीत ओमिका काळे यांचा सहभाग

आळंदी/अर्जुन मेदनकर: दिल्लीतील महानिदेशक राष्ट्रीय कैडेट कोर कैम्प संचालन रँली व तीन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमास कु. ओमिका काळे या एकमेव विद्यार्थिनींची निवड झाली. आळंदी येथील राँयल गंगा हौसिंग सोसायटीचे उपाध्यक्ष निळकंठ काळे यांची कन्या असून यशवंतराव चव्हाण लाँ काँलेज पुणे येथे बीए एल. एल. बी. पदवी द्धितिय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ओमिका काळेला नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवशीय संचालन रँली व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तिची निवड झाली.

पुणे जिल्ह्यातील विधी पदवी शालेय गटातून तसेच पुणे येथील ग्रुप एनसीसी हेडकाँटर डिजी कँप्ममधून ओमिका काळे हिची नवी दिल्ली संचालन रँलीसाठी निवड झाली आहे. ग्रुप कँप्टन COL निलेश पाथरकर, कंमाडिग आँफिसर ग्रुप कँप्टन अभिजित खेडकर ३ महाराष्ट्र एअर SQN एनसीसी अधिकारी पुणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशवंतराव चव्हाण लाँ काँलेज प्राचार्य सुभदा घोलप, आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वकाम सेवा मंडळ अध्यक्ष सुनिल तापकीर, स्वकाम सदस्य निळकंठ काळे, महानिदेशक राष्ट्रीय कैडेट कोर कंमाडिग अधिकारी व आँफिसर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी देहू रस्ता येथील ज्ञानदिप बालक मंदिरात प्रजासत्ताक दिना निमित्त मंडूबाबा पालवे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात झाले. यावेळी राजेंद्र बरदापूरे, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत तापकीर, मुख्याध्यापिका गीता दीक्षित, तृप्ती सुतार यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, नागरिक उपस्थित होते. यावेळी शालेय मुलांनी विविध गुणदर्शन सादर करीत पालकांची मने जिंकली. या वेळी आयोजित कार्यक्रमांत मुलांनी उत्स्फूर्त भाग घेतला..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय