Sunday, July 14, 2024
Homeकृषीआता किसान क्रेडिट कार्ड मधून 'या' योजनांचा लाभ

आता किसान क्रेडिट कार्ड मधून ‘या’ योजनांचा लाभ

मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनाचाही होणार समावेश

तसे तुम्हाला माहिती असेल – आतापर्यंत किसान क्रेडिट कार्डचा लाभ केवळ शेतीशी निगडित बाबींनाच दिला जात होता.

मात्र किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यासाठी, काल सोमवारी केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते ‘राष्ट्रव्यापी एएचडीएफ केसीसी कॅम्पेन’ सुरू करण्यात आले आहे.

जाणून घ्या सविस्तर

या मोहिमेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी हे दूध संघांशी जोडले जाणार आहेत – तसेच ही मोहीम 15 नोव्हेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 या दरम्यान सुरु राहणार आहे.

यामध्ये गोवंश पालन, बकरी, डुक्कर आणि कुक्कुटपालन अशा विविध पशुपालकांचा समावेश करण्यात येणार आहे.

तसेच शेतीशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांनाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ होनार आहे – या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेती कामासाठी तीन लाख रुपयांचे तर पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी 2 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.

प्रक्रिया शुल्क होणार- यापूर्वी अर्जदारांना केसीसी माध्यमातून कर्ज घेण्यासाठी तीन ते चार हजार प्रक्रिया शुल्क रुपये लागत होता.

मात्र आता सरकारने प्रक्रिया शुल्क घेणे बंद केले आहे – म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज आहे त्यांनाच प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले.

मात्र पशुपालन आणि मत्स्यपालन यांना हे दर कायम राहणार आहेत.

कुठं मिळणार कार्ड ? – किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी 

येथे क्लिक करा

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card

 

तसेच आपण 1800-180-1551 या हेल्पलाईन वर कॉल करून अधिक माहिती घेता येणार.

आता किसान क्रेडिट कार्डमध्ये- मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनाचाही समावेश होणार – हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय