Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणचांदवडच्या अर्धपीठ असलेल्या रेणुका मातेची यात्रा नाहीच परंतु भाविकांना दर्शन घेता येणार

चांदवडच्या अर्धपीठ असलेल्या रेणुका मातेची यात्रा नाहीच परंतु भाविकांना दर्शन घेता येणार

spot_imgspot_imgspot_imgspot_img
Photo Credit : Sunil Sonawane

चांदवड (सुनिल सोनवणे) : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुका मातेचा नवरात्र उत्सवात यात्रा भरणार नसून या ठिकाणी दहा दिवस घटी बसणाऱ्या स्त्रियांना व पुरुषांना यावर्षी सुद्धा घटी बसता येणार नाही.

शासनाने कोरोना काळात महाराष्ट्रातील संपूर्ण मंदिरे बंद केली होती, त्यामुळे चांदवड येथील रेणुका माता मंदिर आत्तापर्यंत बंद होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील व कुलदेवी असलेल्या भाविकांना मातेचे दर्शन घेता आला नाही परंतु आता महाराष्ट्र सरकारने घटस्थापनेपासून मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे रेणुका देवी ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला व सर्व भाविकांना रेणुका मातेचे दर्शन सुलभ कसे घेता येईल याची संपूर्ण व्यवस्था बँरीकटिंग, साफसफाई व सीसीटीव्ही कॅमेरे लावून दर्शन कसे चांगल्या पद्धतीने होईल यासाठी ट्रस्टचे प्रयत्न चालू आहेत.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारचे दुकाने लावता येणार नाहीत. भाविकांनी सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापक मधुकर पवार व सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केले आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय