Wednesday, February 12, 2025

देहूरोड कँन्टामेंन्ट बोर्डाचे हॉस्पिटलकडून अँम्ब्युलन्स गैर वापर, कोर्टाचे चौकशीचे आदेश

पिंपरी चिंचवड : खासदार रंग बारणे यांच्या खासदार निधीतून  देहूरोड छावणी परिषदला कार्डियाक ऍम्ब्युलन्स लोकांच्या आरोग्याच्या सोयी करिता देण्यात आली असताना कोरोना काळात प्रवासी वाहतुकी बरोबरच सामान वाहतुकीसाठी गैर वापर केला पण गरजू नागरिकाला कार्डियाक अँम्ब्युलन्सची सेवा दिली नाही. कार्डियाक अँम्ब्युलन्समध्ये वैद्यकीय उपकरणे बसविण्यासाठी ८,०५,३६५ रुपयाचा खर्च दाखून त्या रक्कमेचा अपहार केला.

याबाबत देहूरोड छावणी परिषेदचे तत्कालीन CEO रामस्वरूप हिरितवाल आणि  RMO सुनीता जोशी यांनी कायद्याने सोपविलेल्या जबाबदारीत अप्रामाणिकपणा करून  फौजदारी न्यास भंग करून मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन करीत गुन्हा केलेबाबत मानवी हक्क न्यायालय वडगाव मावळ न्यायाधीश ए. एस . आगरवाल यांच्या  कोर्टात मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, मेहरबनसिग तक्की व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी दावा दाखल केला होता.



त्या दाव्यात न्यायाधीश ए. एस .आगरवाल यांच्या कोर्टाने देहूरोड पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी दिली आहे. “कोरोना काळात आरोग्याच्या सुविधा व साथ रोग प्रतिबंद करण्याकरिता राज्य व केंद्र शासनाकडून आलेल्या निधीचा अपहार करण्यातच रामस्वरूप हरितवाल- CEO आणि सुनीता जोशी – RMO गुंतले होते – अण्णा जोगदंड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मानवी हक्क संरक्षण व जागृती”

पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

पुणे‌ येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles