Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होतील परंतु रिमोट कंट्रोल दुसऱ्या कुणाच्या हातात असेल, काँग्रेस नेते तारीक अन्वर यांची टीका

---Advertisement---

पाटणा – संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. सोमवारी सकाळी कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्‍याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.

“नितीश कुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी भाजपाने त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवलं आहे” असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान बिहारमध्ये नितीश कुमार यांची एनडीएने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश कुमार हे आमदारांसह राज्यपालांना भेटले. त्यानंतर आता नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

---Advertisement---

 

तारिक अन्वर यांच्या काँग्रेस पक्षाने महाआघाडी अंतर्गत बिहारमध्ये एकूण 70 जागा लढवल्या. पण फक्त 19 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. जागावाटपात उशीर झाल्याने आवश्यक तेवढा प्रचार करता आला आहे, हे पराभवाचं कारण असल्याचं तारिक अन्वर यांनी याआधी म्हटलं होतं. तसेच बिहारमध्ये सत्ता बदलाची लाट आली. पण ही संधी आम्हाला मिळवता आली नाही असं देखील ते म्हणाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles