Monday, January 13, 2025
Homeराज्यअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार पडला पार, ‘या’ 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार पडला पार, ‘या’ 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर जवळजवळ 40 दिवसांनंतर शिंदे – भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

शिंदे गटातील मंत्री

गुलाबराव पाटील (कॅबिनेट)

दादा भुसे (कॅबिनेट)

संजय राठोड (कॅबिनेट)

संदीपान भुमरे (कॅबिनेट)

उदय सामंत (कॅबिनेट)

तानाजी सावंत (कॅबिनेट)

अब्दुल सत्तार (कॅबिनेट)

दीपक केसरकर (कॅबिनेट)

शंभूराज देसाई (कॅबिनेट)

भाजपतील मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)

सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)

चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)

विजयकुमार गावित (कॅबिनेट)

गिरीश महाजन (कॅबिनेट)

सुरेश खाडे (कॅबिनेट)

रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)

अतुल सावे (कॅबिनेट)

मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यावर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय