NHAI Recruitment 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात (National Highways Authority of India) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHAI Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)” या पदासाठी एकूण 60 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
(हेही वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 309 जागांसाठी भरती)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2025 असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली असून एससी, एसटी उमेदवारांसाठी 5 वर्ष तर ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
वेतनमान आणि नोकरी ठिकाण
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 56,100 ते 1,77,500 पर्यंत पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
(हेही वाचा : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत 582 पदांची भरती)
अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुन 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
NHAI Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
(हेही वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 2795 पदांची भरती)
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुन 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.