Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यकोरोनामोठी बातमी : राज्यात नवे निर्बंध लागु, वाचा "असे" आहेत निर्बंध !

मोठी बातमी : राज्यात नवे निर्बंध लागु, वाचा “असे” आहेत निर्बंध !

मुंबई, ता. ८ : राज्यात करोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४० हजार ९२५ रुग्ण आढळले तर मागील २४ तासात राज्यात ४१ हजार ४३४ रुग्ण आढळले आहेत, या वाढत्या करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जाहिर केले आहे. रविवार रात्रीपासून (ता.९) हे नियम लागू केले जाणार आहेत. 

 

 “असे” आहेत निर्बंध

– राज्यात रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

– जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, पर्यटन केंद्र , किल्ले, म्युजियम बंद राहणार आहे.

– सलून ५०% क्षमतेने रात्री १० पर्यंत चालू ठेवता येणार आहेत.

– शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये ५०% क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

– मॉल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे. 

– शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

– हॉटेल ५०% क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र, रात्री दहा वाजता ते बंद करावे लागणार आहे.

– कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असणार आहेत.

– दहावी, बारावीच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार

– दोन्ही डोस झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता येणार

– लग्न समारंभात फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.

– अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

-सार्वजनिक कार्यक्रमांना ५० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

अधिक वाचा : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा

संबंधित लेख

लोकप्रिय