सुरगाणा : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे बाजारीकरण करणारे, तर कामगार संहिता हक्काची नोकरी हिरावून घेणाऱ्या आहेत, अशी टिका स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) राज्य सचिव रोहिदास जाधव (Rohidas Jadhav) यांनी केले.
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे १२ वेळ राज्य अधिवेशन सुरगाणा येथे सुरू आहे. त्यावेळी अधिवेशनास शुभेच्छा सत्रात ते बोलत होते.
सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी
पुढे बोलताना जाधव म्हणाले, “देशात बेरोजगारीच्या खाईत लोटला जातो आहे. देशांतील केंद्र आणि राज्य सरकारही विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी युवकांची एकजूट उभारून तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे.”
यावेळी डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष सुनिल धानवा, राज्य सचिव प्रिती शेखर, अजय बुरांडे, गणेश दराडे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिवेशन प्रतिनिधी उपस्थित होते.
कातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य
वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, माहिती आणि सुरक्षा महत्वाची : डॉ.संतोष घुले