Saturday, December 7, 2024
HomeNewsनवी दिल्ली : मोदी सरकारच्या पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅस विरोधात मार्क्सवादी...

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅस विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जोरदार निदर्शने

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅस विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. 

केंद्र सरकार जनसामान्यांची लूट करत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण असताना मोदी सरकार करत असलेली दरवाढ योग्य नाही. तरी सरकारने दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली.

या आंदोलनास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोलिटब्यूरो सदस्य वृंंदा करात, हनन मोल्ला, मरियम ढवळे, अशोक ढवळेे, दिल्ली राज्य कमेटी सचिव के. एम. तिवारी यांनी संबोधित केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

संबंधित लेख

लोकप्रिय