Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

साताऱ्यात नवे १५९ कोरोना पॉझिटिव्ह, नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवहान

---Advertisement---

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शुक्रवारी नवीन १५९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा आता ६० हजार ४७६ वर पोहोचला. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळीची संख्या १ हजार ८६९ वर पोहोचली आहे.

---Advertisement---

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केल्यानुसार १५९ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला. यामध्ये सातारा शहरात अधिक रुग्ण आढळून आले. तर तालुक्यातील नुने, शिवथर, वडूथ, पोगरवाडी, महागाव, सोनगाव आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. 

कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील मलकापूर, कोरीवळे, सैदापूर येथे तसेच पाटण तालुक्यातील गोरेवाडी येथे रुग्ण आढळून आले. फलटण शहराबरोबरच तालुक्यातील कोळकी, जिंती, तरडगाव, मुरुम, चोपदारवाडी, आदर्की बुद्रुक, साखरवाडी, घाडगेवाडी, सासवड आणि गोखळी येथे तर खटाव तालुक्यातील खटाव, कातरखटाव, वडूज, बनपुरी, पुसेगाव, निमसोड गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले.माण तालुक्यातील जाशी, म्हसवड, गटेवाडी येथे तर कोरेगाव शहरासह तालुक्यातील सातारारोडला कोरोना रुग्ण समोर आले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, शिंदेवाडी, पारगाव, लोणंद, आसवली, पाचवड, धनगरवाडी, सांगवी येथे तसेच वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झालेली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात कऱ्हाड येथील ६८ वर्षांच्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles