Thursday, September 19, 2024
HomeNewsनेहा कक्कर ची "नाराजगी" प्रेक्षकांना भावली ,तीन तासात पंचवीस लाख व्ह्यू !

नेहा कक्कर ची “नाराजगी” प्रेक्षकांना भावली ,तीन तासात पंचवीस लाख व्ह्यू !

बॉलिवूडमधील आघाडीची गायिका नेहा कक्कर हिच्या नाराजगी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याने युट्युब वर धुमाकूळ घातला आहे .नाराजगी हे नवं गाणं सध्या यु ट्यूब वरती ट्रेंडिंग आहे.

या गाण्याला अवघ्या दोन तासात पंचवीस लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे .दोन लाखाहून अधिक लोकांनी या गाण्याला लाईक केले आहे. तर एक हजारापेक्षा जास्त कमेंट करून या गाण्याविषयी लोकांनी आपली मते मांडले आहेत. नेहा कक्कर ने स्वतः या गाण्याच्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट केली आहे.

“मला नेहमीच अशा प्रकारचं गाणं जायचं होतं आणि तसं गाणं मी गायल आहे. मला आशा आहे की ते गाणं तुम्हालाही आवडलं असेल”

“खैरीयत भी पूछ ते नही ना बात करते हो” असं म्हणत आपली नाराजगी हे नवं गाणं रिलीज झाल्याचं नेहाने इंस्टाग्रामवर सांगितलं आहे. या गाण्याची एक झलक ही तिने पोस्ट केली आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात नंतर हे गाणं रेकॉर्ड तोडेल यात शंका नाही.

संबंधित लेख

लोकप्रिय