CET for NDA Admission 2024 : भारतीय लष्कराच्या नौदल, वायुदल आणि सैन्य दलासाठी सक्षम अधिकारी घडविण्यासाठी 1955 साली पुण्यात खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ची स्थापना करण्यात आली आहे. बारावीनंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर 6 महिन्यांनी एनडीए तसेच नेव्हल अॅकेडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी 400 विद्यार्थ्यांची संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. NDA
● पुढील परिक्षा : 1 सप्टेंबर 2024
● पद संख्या : 400 (मुले 470, मुली 30)
● वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2006 आणि 1 जानेवारी 2009 दरम्यान असावा.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जून 2024
प्रवेश परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून त्यासाठीची जाहिरात 15 मे 2024 रोजी upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. 4 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे.
● परिक्षा पद्धती !
या प्रवेशासाठी ची लेखी परीक्षा ऑब्जेक्टीव्ह स्वरुपाची असते, ज्यामध्ये अडीच तासांचे 2 पेपर असतात. पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो, तर दुसरा पेपर जनरल अॉबिलिटी चा सहाशे मार्कांचा असतो. या दुसऱ्या पेपरमध्ये दोनशे गुणांचा इंग्रजी चा तर चारशे गुणांचा फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो. जो upsc. gov. in या संकेतस्थळावर बघता येतो.
● निवड करण्याची प्रक्रिया :
या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत एस एस बी इंटरव्ह्यू साठी बोलावले जाते. हा इंटरव्ह्यू प्रदीर्घ म्हणजे पाच दिवस चालतो ज्यात दोन टप्पे असतात. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्याकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते.
● प्रशिक्षण कालावधी आणि पुढील प्रक्रिया :
निवडलेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंतर त्यांच्या क्षेत्रात (आर्मी / नेव्ही / एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून 1 लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते. एनडीए चे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.
NDA


हेही वाचा :
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती
सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती
IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती