Thursday, November 21, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवे चिन्ह, 'या' चिन्हावर...

मोठी बातमी : शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवे चिन्ह, ‘या’ चिन्हावर लढणार निवडणूक

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नव्या चिन्हा संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवीन चिन्ह दिले आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. Sharad Pawar Party New Symbol

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. यासंदर्भात पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली.

शरद पवारांच्या पक्षानं ट्विटमध्ये म्हटलं की, “एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!” “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी,शरद पवारांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

संबंधित लेख

लोकप्रिय