Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शरद पवार धमकीप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची शहर कार्याध्यक्षा ज्योती गोफणे यांची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.९ –
देशाचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना Twitter च्या माध्यमातून काही समाजकंटकानी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार असून देशाच्या सर्वोच्च नेत्याला अशी धमकी मिळणे ही देश आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे.

त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षा ज्योती गोफणे यांनी केली आहे. यासंदर्भात ज्योती गोफणे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी शहर उपाध्यक्षा सारिका हरगुडे, मेधा पळशीकर, रंजना रणदिवे, शैला सातपुते, व्हीजेएनटी सेल सरचिटणीस रजनी गोसावी, सफाई कामगार सेल अध्यक्षा सुवर्णा निकम, सरचिटणीस राजेश हरगुडे, राजश्री गोफणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर निवेदनात गोफणे यांनी म्हंटले आहे की, आमचे नेते शरद पवार हे देशातील सर्वोच्च नेते आहेत.त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार म्हणजे राज्यातीलच नव्हे तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस न्यायासाठी थेट रस्त्यावर उतरतील, असा इशाराही ज्योती गोफणे यांनी यावेळी दिली.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles