Thursday, February 13, 2025

केबल इंटरनेटचे जाळे गुन्हेगारांकडे सोपविण्याचा प्रयत्न हाणून पाडा, राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी.



पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेटचे संपूर्ण जाळे आंतरराष्ट्रीयगुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा प्रयत्नपोलिसांनी हाणून पाडावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आजकेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरिक्तपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंदर्भातील एक लेखी निवेदन दिले.

राष्ट्रवादीच्याशिष्टमंडळात अजित गव्हाणे यांच्यासह महिला अध्यक्षा कविता आल्हाट, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, माजी अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, नारायण बहिरवाडे, सतिश दरेकर, प्रवक्ते विनायक रणसुबे, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, हरिभाऊ तिकोणे,माधव पाटील, कविता खराडे, अकबर मुल्ला, काशिनाथ जगताप, युसूफ कुरेशी, गंगा धेंडे,किरण देशमुख,विनय शिंदे, निर्मला माने,सविता धुमाळ, संगीता कोकणे, ज्योती तापकीर, पूनम वाघ, दिपाली देशमुख, यांचा समावेश होता.

दुबई आणिपाकिस्तानशी कायम संपर्क असलेल्या तसेच गुजराथ मधील अहमदाबादमध्ये बनावट टेलिफोनएक्सचेंज चालविले म्हणून गुन्हा दाखल केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशीसंबंधीतांकडेच पिंपरी चिंचवड शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविण्यात येणारआहे. शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचाही त्यासाठी बराच आग्रह आहे.अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातातशहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो. केबलइंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणीउकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाही.  महिला आणिमुलिंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माणकऱण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते इतकेच नाही तर अतिरेकी कारवायासुध्दा होऊशकतात.

शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या निर्णयावर पोलिसांनीठोस भूमिका घेण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली.शुक्रवारी (दि.२३)आयोजित स्मार्ट सिटी समितीच्या बैठकित या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर अंतिमनिर्णय होणार आहे. समितीच्या विषयपत्रात त्या विषयाचा समावेश आहे. स्मार्टसिटीच्या कार्यकारणीचे कार्याध्यक्ष महापालिका आयुक्त असले तरी पिंपरी चिंचवडपोलिस आयुक्त हे पदसिध्द संचालक आहेत. आता त्यांनीच या विषयाचे गांभीर्य लक्षातघ्यावे आणि शहराचा घात होऊ नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी गव्हाणे यांनी केली आहे. केबल इंटरनेटचा उद्देश चांगला, पण -पिंपरी चिंचवडशहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल डक्ट तयार कऱण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्त्रोतम्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता.

महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणेअपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवारहोणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्टसिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच काढली होती, त्यात तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. मेसर्स रेलटेलकॉर्पोरेशन, मेसर्सयुसीएन केबल या दोन कंपन्यांशिवाय मेसर्स सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड – मेसर्स फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदारकंपनीने निविदा भरली आहे. सुयोग टेलिमॅटिक्स लि.- फायबर स्टोरी कम्युनिकेशनप्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ट ठरली आणि त्यांना काम देण्याची घाईस्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles